गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात मोफत डायलिसिस सेंटरचे उद्घाटन

Foto
गंगापूर परिसरातील मूत्रपिंड रुग्णांना मिळणार मोठा दिलासा

गंगापूर, (प्रतिनिधी) : डायलिसिससाठी वारंवार छत्रपती संभाजीनगर येथे धाव घ्यावी लागणाऱ्या गंगापूर व परिसरातील मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून, गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात मोफत डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सुविधेमुळे रुग्णांचा वेळ, आर्थिक खर्च तसेच शारीरिक त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

या मोफत डायलिसिस सेंटरचे उद्घाटन सोमवार, दि. ५ जानेवारी रोजी उपजिल्हा रुग्णालय, गंगापूर येथे आमदार प्रशांत बंब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष संजय जाधव, जिल्हा रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर, निवासी जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत बडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभिजित खंदारे, प्रशिक्षणार्थी तहसीलदार सागर वाघमारे, गटविकास अधिकारी सुहास वाकचौरे, सहाय्यक गटविकास अधिकारी अक्षय भालेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रंगनाथ तुपे, डॉ. सुदाम लगास, वाल्मिक शिरसाठ, माजी नगरसेवक प्रदीप पाटील, रुग्ण कल्याण समिती सदस्य अतुल रासकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष मारुती खैरे, नगरसेवक राकेश कळसकर, माजी नगरसेवक भाग्येश गंगवाल, डॉ. आबासाहेब शिरसाठ, सामाजिक पदाधिकारी आनंद पाटील, गोपाल वर्मा, रज्जाक पठाण, भारत पाटील, दीपक साळवे, कृष्णा सुकासे, उपसभापती सचिन काकडे, माजी सभापती भाऊसाहेब पदार, सचिन विधाटे, अमोल शिंदे, बापू शिंदे, रामेश्वर पाटील, कृष्णकांत व्यवहारे, प्रशांत मुळे, संकेत मते, विठ्ठल भटकर, गौरव तांगडे, संतोष गायकवाड, मोहम्मद बाकोदा, रफिक दादा, प्रकाश खाजेकर, सलमान शेख, श्रीमंत चापे, संदीप बोजवारे, सोमनाथ शिंदे तसेच आरोग्य सेवक हनुमंत वानोळे, अनिल चव्हाण, शिवराज दारंटे, अमोल साळवे, मोहसिन चाऊस, शरद दारुंटे आदींसह रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिकारी आशिश शेंडगे, सेन्टर इनचार्जे सचिन चुंबळे, डायलिसिस टेक्निशियन समीर शेख, नर्सिंग स्टाफ निलेश चव्हाण हे काम पाहाणार आहे.

या मोफत डायलिसिस सेंटरमुळे गंगापूर तालुक्यासह परिसरातील गरजू रुग्णांना वेळेवर व मोफत उपचार मिळणार असून, ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला मोठे बळ मिळाले आहे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.